निवासी मतीमंद विद्यालय वायगाव अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.
मानव विकास बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ, शिराळा ही संस्था ग्रामीण भागातील बौद्धिक अक्षम व विशेष गरजाधारक बालकांच्या शिक्षण व पुनर्वसनासाठी कार्यरत आहे. संस्थेची स्थापना सन १९९६ मध्ये झाली असून २००२ मध्ये शासकीय अनुज्ञप्ती आणि २००४ पासून अनुदान तत्वावर मान्यता प्राप्त झाली आहे.
संस्थेच्या अंतर्गत निवासी मतीमंद विद्यालय, वायगाव (आष्टी) येथे ग्रामीण भागातील ६ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना निवासी स्वरूपात शिक्षण व प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार विशेष शिक्षण पद्धतीद्वारे त्यांना दैनंदिन जीवनातील आवश्यक कौशल्ये शिकवून स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जातो.
तसेच ० ते ६ वर्ष वयोगटातील विशेष गरजाधारक बालकांसाठी शीघ्र हस्तक्षेप सेवा उपलब्ध असून बालकांच्या गरजेनुसार उपचार व पालकांना समुपदेशन दिले जाते.
शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, प्रशिक्षण, निवास, भोजन, आरोग्य तपासणी व आवश्यक उपचार या सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. संस्थेचे मुख्य ध्येय म्हणजे विशेष गरजाधारक बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना स्वावलंबी व सन्मानाने जगण्यासाठी सक्षम बनवणे. आणखी वाचा
आमची वैशिष्ठे

निवासी वसतिगृह सुविधा
ग्रामीण भागातील बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी शाळेत सुरक्षित, स्वच्छ आणि निगराणीखालील निवासी वसतिगृहाची व्यवस्था आहे. विद्यार्थ्यांना शाळेतच राहण्याची सोय उपलब्ध असल्यामुळे त्यांना नियमित शिक्षण व प्रशिक्षण मिळण्यास मदत होते.

पौष्टिक व संतुलित आहार
विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी शाळेमध्ये नियमितपणे स्वच्छ, संतुलित व पौष्टिक आहार दिला जातो. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विशेष विचार करून आहाराची व्यवस्था केली जाते.

विशेष शिक्षण व जीवन कौशल्य प्रशिक्षण
बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांच्या बौद्धिक पातळी व क्षमतांनुसार विशेष शिक्षण पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यांना स्वच्छता, स्वावलंबन, संवाद कौशल्ये आणि दैनंदिन जीवनातील आवश्यक कौशल्ये शिकवली जातात.

अनुभवी शिक्षक व विशेष शिक्षक
शाळेमध्ये विशेष शिक्षणाचे प्रशिक्षण घेतलेले अनुभवी शिक्षक आणि कर्मचारी कार्यरत आहेत. ते विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक क्षमतेनुसार त्यांना योग्य शिक्षण व प्रशिक्षण देतात.

सांस्कृतिक कार्यक्रम व सण उत्सव
विद्यार्थ्यांमध्ये आनंद, सहभाग आणि सामाजिक जाणीव वाढवण्यासाठी शाळेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ आणि सण उत्सव साजरे केले जातात.

पालक मार्गदर्शन व समुपदेशन
विद्यार्थ्यांच्या विकासामध्ये पालकांची महत्त्वाची भूमिका असल्यामुळे वेळोवेळी पालकांसाठी मार्गदर्शन शिबिरे व समुपदेशन कार्यक्रम आयोजित केले जातात.
प्रवेश प्रक्रिया
प्रवेश प्रक्रिया माहितीसाठी "प्रवेश प्रक्रिया "हे पान पहा. तसेच इतर माहिती व मदती साठी "संपर्क" या पानावर दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.





